ॲड. सोमनाथ वैद्य: एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा विकास

१९ वर्ष मंत्रालयीन प्रशासकीय  कामाचा अनुभव 

दक्षिण सोलापूर, आपल्या सांस्कृतिक वारशाने आणि समृद्ध समुदायाने प्रसिद्ध असलेला क्षेत्र, आता सोमनाथ वैद्य यांच्या वाढत्या प्रभावामुळे एक नवीन राजकीय दृष्टिकोन अनुभवत आहे. वैद्य, एक समर्पित सार्वजनिक सेवक आणि दूरदर्शी नेता, या क्षेत्रातील आव्हानांवर उपाय शोधत आहेत आणि स्थानिक रहिवाशांच्या जीवनमान सुधारण्यासाठी विविध उपक्रम चालवत आहेत.

प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी:-

१९ वर्षांचा मंत्रालय विधानभवन प्रशासकीय अनुभव असलेले ऍड सोमनाथ वैद्य ह्यांचा जन्म सोलापूर मध्ये लिंगायत समाजात झाला आहे. अकरावी ते बी.ए. (इंग्लिश) पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातून घेतले. याकाळात ते दयानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहात रहात होते. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथील के.सी. विधी महाविद्यालय, चर्चगेट येथून त्यांनी एलएलबी ही कायद्याची पदवी संपादित केली. या दरम्यानच ते तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरच्या तत्कालीन पालकमंत्र्याचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहायक म्हणून वयाच्या 22 व्या वर्षीच नोकरीत दाखल झाले होते. त्यानंतर भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांचे पी.ए. म्हणून ते काम पहात आहेत.

कामांचा पाठपुरावा आणि विकासकार्य

गेल्या १९ वर्षांच्या काळात मंत्रालय स्तरावर सोमनाथ वैद्य यांनी अनेक कामांचा पाठपुरावा केला आहे. मसला खुर्द या गावी २५/१५ निधीतून संपूर्ण गावाचा त्यांनी विकास केला आहे. गावात ८ ते १० वर्षात त्यांनी सतत मंत्रालयात विविध विभागात पाठपुरावा करून सुमारे दोन कोटींचा निधी आणला. त्यातून अंतर्गत सिमेंट रस्ते आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करत गावाचा कायापालट केला. याची दखल गावातील स्थानिक नेतेमंडळींनी घेवून गेल्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये सोमनाथ वैद्य यांच्या वडिलांची गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. यापूर्वीही सोमनाथ यांचे आजोबा यांनी १५ वर्षे गावचे उपसरपंच पद भूषविले आहे. आजोबा आणि वडील राजकारणात सक्रिय असल्याने सोमनाथ यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. ते लिंगायत वाणी समाजाचे असल्याने गावात त्यांचे किराणा दुकान होते या माध्यमातून गावातील लोकांशी त्यांचा सतत संपर्क लहानपणापासून आल्याने त्यांना सार्वजनिक जीवनाची आवड निर्माण झाली त्यामुळेच लहानपणापासूनच सार्वजनिक जीवनातील अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत.

उद्योजक-उद्योगपतींशी जवळीक

भोसरीचे भाजपाचे आमदार महेशदादा लांडगे स यांचे पी.ए. म्हणून सोमनाथ वैद्य यांचा पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसीशी चांगला संपर्क आहे. राज्यातील सर्वात मोठा औद्योगिक परिसर म्हणून याभागाकडे पाहिले जाते. साधारणतः लाखभर कारखाने आणि लघु उद्योग इथे कार्यरत आहेत. या भागातील लघु- कुटीर उद्योग संघटना किंवा मोठ्या उद्योजकांची संघटना आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे शासनस्तरावरील कामांसाठी सतत संपर्कात असतात. आमदार महेशदादा लांडगे यांच्या आदेशानुसार सोमनाथ वैद्य यांनी या लोकांच्या चांगल्या प्रकारे संपर्कात राहून त्यांच्या समस्या शासनस्तरावर सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांचा PA म्हूणन 9 वर्ष काम केल्याने त्यांचा अनेक उद्योगपतीशी जवळून संबंध आला आहे तसेच राज्यभरातील अनेक राजकीय जीवनात काम करण्याऱ्या अनेकांशी वैदय यांनी चांगले संबंध ठेवले आहेत

स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन

प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेऊन सोमनाथ वैद्य यांनी अनेक गरजूना सढळ हाताने स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून मदत केली आहे यामध्ये 5 हजार महिलांना पर्स भेट, 10 हजार शेतकरी यांना छत्री वाटप, 300 पेक्षा गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य आणि शिषवृत्ती तसेच सोलापूर शहरातील सर्वात मोठ्या दहीहंडी उपक्रमाचे वैदय यांनी आयोजन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विविध उपक्रमांचा धडाका

नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमेच्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे सोमनाथ वैद्य यांनी ५१ हजार बेसन लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप केले तसेच श्रावण महिन्यात दक्षिण सोलापूर मधील विविध मंदिरमध्ये महाप्रसाद आयोजन करून मोठ्या प्रमाणात आजपर्यंत अन्नदान केले आहे.

पत्रकारांच्या १९५ पाल्यांना शिष्यवृत्ती

सोलापूर शहरातील श्रमिक पत्रकारांच्या १९५ पाल्यांना सोमनाथ वैद्य यांच्या फाऊंडेशन मार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. हा कार्यक्रम सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या मार्फत सोमनाथ वैद्य यांनी आयोजित केला. या कार्यक्रमात दै. संचारचे धर्मराज काडादी साहेब , दै. सुराज्यचे राकेश टोळ्ये साहेब आणि इतर वृत्तपत्रांच्या संपादकांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.

परदेश दौरा 

देशाअंतर्गत दिल्ली येथे वैदय  यांनी 2 वर्ष वास्तव्य केले असून प्रशासकीय कामासाठी 200 पेक्षा अधिक वेळा दिल्ली दौरा केला आहे आजपर्यंत गेल्या 15 वर्षात सोमनाथ वैदय यांनी 3 वेळा युरोपियन देशाचा दौरा केला असून चीन दुबई देशाचा दौरा केला आहे.

स्वयंम शिक्षा फाऊंडेशन चे संस्थापक सोमनाथ (सोमेश) वैद्य

हिंदू रूढी व परंपरा अखंड वृद्धिंगत व्हाव्या याकरिता स्वयंम शिक्षा फाऊंडेशन चे संस्थापक सोमनाथ (सोमेश) वैद्य 

Back to Top
Product has been added to your cart